स्वयंपाकघर
स्वयंपाकघर कसं असावं?
एक तरी लोणचं, मुरांबा, चटणी, किंवा ठेचा आणि त्याच्या तीन छोट्या छोट्या बाटल्या
हात पुसायला कमीत कमी चार फडकी, चार कोपऱ्यात
सांडलेले तेल पुसायला पटकन सापडेल असा पेपर
शेगडीजवळ चमचे, फक्त हमखास लागतात म्हणून
दोन लायटर, म्हणजे एका ठिकाणचं तरी हाताला लागेल
गाणी लावायची सोय
सहज टेकून उभं राहता येईल अशी एक भिंत
ओट्यावर कधीही बूड ठेवून गप्पा मारता येतील एवढी जागा
दुसऱ्या माणसाला बसायला एक खुर्ची
माझ्यासारखे असाल तर तिसरा माणूसही नक्की असेल बरोबर, त्याच्यासाठी मोडा
अगदी कोपऱ्यातल्या कपाटात सर्वात मागे एक जिनची अर्धी भरलेली बाटली
आणि कोकम सरबत.
बढिया. जिनची बाटली आहे तेवढ्यातच चक्कर मारण्यात अर्थ आहे...
ReplyDelete