कामोद


आज सोमवार
पण काम नव्हतं, घाई नव्हती
सकाळी ११ ला आंघोळ आटोपली
दही पोह्यांचा नाश्ता केला,
जरा जास्तंच झाले होते.
झोप काढायला म्हणून पडले
झोप लागणार,
तेवढ्यात -
तो आठवला
रे वरनं गाठणारा, कामोद
त्याची आडा चौतालात बांधलेली बंदिश,
तिचं वजन.
वर्षभर झालं शिकून
आज आढळला, उमजला, आकळला.

Comments

Post a Comment

Popular Posts