साथ


एक व्यासपीठ
दोन कलाकार
एकच राग,
एकच ताल.
जे असेल ते दोघांचं
नसेल तर कोणाचं नाही.

तरी एक मधोमध 
आणि दुसरा बाजूला.
एक वाजवणारा,
दुसऱ्याला जागा देणारा.
एकाची कला 
पण दुसऱ्याची
साथ.

Comments

Popular Posts