असतेस तू, नसतेस तू


समुद्राच्या लाटांना
अलगद जाऊन मिळतेस तू

कृष्णेचं खळाळतं पाणी
म्हणजे तुझं हसणं जणू

श्रावणातल्या पावसासारखी 
येतेस तू, जातेस तू

चमकून जाणाऱ्या विजेसारखी
असतेस तू, नसतेस तू


Comments

Popular Posts